About Us
आमच्याविषयी
Step By Step गणित ही विद्यार्थ्यांच्या गणितातील भीती दूर करून त्यांना आत्मविश्वासाने गणित शिकवण्याच्या उद्देशाने सुरू केलेली वेबसाईटआहे. आमचे ध्येय केवळ गुण वाढवणे नसून विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि कायमस्वरूपी समजावून देणे आहे. आम्ही विशेषतः 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी संकल्पनाधारित अध्यापन पद्धती वापरतो. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती वेगळी असते, याची जाणीव ठेवून वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित सराव, साप्ताहिक चाचण्या आणि शंका निरसन यावर आम्ही भर देतो.
Step By Step Math चे संस्थापक प्रशांत पाटील यांना विद्यार्थ्यांसोबत काम करण्याचा आणि गणित सोप्या पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना गणित समजून घेणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शैक्षणिक प्रगती साधणे शक्य होते.
आमचा विश्वास आहे की योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी गणितात यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच आम्ही “गणिताची भीती नाही, आत्मविश्वासाची नवी सुरुवात” या विचाराने कार्य करतो.
Step By Step Math – Learn Mathematics in Easy way
